व्याख्याने

एकलव्य प्रकाशन नामक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत सेल्स ऑफिसर ते रिजनल मॅनेजर पदापर्यंत प्रवास ! त्यानिमित्ताने महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात स्वयं अध्ययनाच्या विषयावर दीडशेच्या वर व्याख्याने !

वक्तृत्व, निबंध
आणि वादविवाद

शालेय तसेच महाविद्यालयीन आयुष्यात वक्तृत्व, निबंध, आणि वादविवाद स्पर्धांमध्ये प्राविण्य पदकं आणि पुरस्कार ! डोंबिवलीतील प्रतिष्ठित पू भा भावे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत प्रथम येण्याचा बहुमान !

मार्केटिंग

कॉलेज जीवनापासून नोकरी मार्केटिंग च्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास ! महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, तेथील माणसे, त्यांच्या समस्या, त्यांचे खाणेपिणे, आयुष्य ह्यांचा जवळून अभ्यास !

व्यावसायिक
वाटचाल

क्षितिज मार्गदर्शन संस्था नामक शैक्षणिक संस्थेची स्थापना सन २००२ , डोंबिवली पूर्व ! देवराज अकॅडमी नामक क्लासेस ची स्थापना. एकमेव क्लासेस जिथे 8 वी ते 10 वी वर्गातील मुलांना शिकवण्या सोबत योगासने आणि समुपदेशन चालत असे. डोंबिवली पश्चिम येथे होती दुसरी शाखा ! महेश tutorials नामक क्लासेस मध्ये मराठी, तसेच भूगोल आणि अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन ! मराठी माध्यम, मराठी विषय , मराठी उच्च भाषा येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून ५ वर्षे काम ! मराठी संतवाणी, कविता, लेखंकौशल्य विषयावर विविध तंत्रफिती आणि चित्रफितींची निर्मिती संपूर्ण मुंबई तसेच नाशिक , औरंगाबाद येथे शालेय विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे मार्गदर्शन ! विद्यार्थीप्रिय शिक्षक असा आजवर मिळवला लौकिक ! जयेश लर्निंग सेंटर डोंबिवली येथे प्रथम भागीदारीत सुरू केला व्यवसाय ! त्यानंतर सर्व मालकी हक्क स्वतःकडे घेऊन विद्यावर्धिनी ह्या स्टेट बोर्ड , सी.बी.एस. ई. आणि आय.सी.एस. ई. बोर्ड शिकवणाऱ्या 7 to 10th क्लासेस चे नवनिर्माण !

निसर्ग विज्ञान
संस्था सदस्य

सर्प मित्र आणि प्राणीमित्र ह्या नात्याने आजवर अनेक विषारी व बिनविषारी सापांना मनुष्यवस्तीतून पकडून आणून जंगलात सुरक्षित पाठवणी ! जंगलाजवळच्या अनेक गावातून पर्यावरण, साप, पक्षी, प्राणी आदी विषयांवर प्रबोधन आणि जनजागृती !

संपर्क करा संपर्क करा

follow
me on facebook